Abortion Pudhari
बीड

Beed crime | गुन्हा लपवण्याच्या नादात स्वतःच अडकले; बीडमध्ये अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणी पालकांवर गुन्हा दाखल

पती सह ५ जणांवर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

माजलगाव : जालना जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका इसमाने आपल्या अल्पवयीन मुलीचा विवाह लावुन दिल्याप्रकरणी तिच्या आई वडिलांसह नवरदेव, सासू व सासरे अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवरदेवावर बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गतही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,पात्रुड येथील रहिवासी राजाभाऊ आवाड व यमुना आवाड यांनी आपल्या अल्पवयीन मुलीचा विवाह परभणी जिल्ह्यातील बोरी येथील किसन दळवी व सखुबाई दळवी यांचा २२ वर्षीय मुलगा आकाश दळवी याच्याशी लावून दिला होता. दरम्यान,९ जून रोजी संबंधित मुलीला पोटदुखीचा त्रास होत असल्याने तिला माजलगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तपासणीदरम्यान ती अल्पवयीन असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने पोलिसांना माहिती दिली.

माजलगाव ग्रामीण पोलिसांनी मुलीच्या वयाची पडताळणी केली असता ती अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार मुलीचे आई-वडील तसेच सासू-सासरे यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच, मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असूनही तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिला गरोदर केल्याप्रकरणी पती आकाश दळवी याच्याविरुद्ध बलात्कार व पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पुढील तपास एपीआय सचिन धोरणाचार्य, पिंक पथक प्रमुख करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT