नेकनूर : बीड तालुक्यातील डोंगरामुळे लाभलेली वनसंपदा उन्हाळ्यात आगीच्या भक्षस्थानी सापडत आहे. शेतात उन्हाळी मशागतीसाठी बांधावरील वाळलेले तण, कचरा जाळण्याच्या नादात काही जणांकडून आगी लावण्याचे प्रकार घडत आहेत. या आगीमुळे वणवा पेटून डोंगरावरील झाडांचा कोळसा होत आहे.
बालाघाटावरील कोल्हारवाडीचा काळोबा डोंगर, कुटेवाडीचे रोपवन गेल्या काही दिवसांपूर्वी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे. या घटना शार्टसर्किटबरोबर बांधावर लावलेल्या आगीमुळे घडल्या आहे. यामुळे या डोंगरांवरील अनेक झाडे जळून खाक झाली आहेत. वनविभागाने याकडे कानाडोळा केल्याने येथील परिसर ओसाड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात उन्हाळी मशागतीसाठी बांधावरील वाळलेले तण, कचरा जाळताना झाडांना त्याची झळ पोहोचणार नाही ना? याची काळजी घेण्याची गरज आहे.
शहरात रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली अनेक झाडांची कत्तल करण्यात आली आहे. तोडण्यात आलेली झाडे पुन्हा लावण्यात येत नाहीत. बांधांवरील कचरा जाळताना झाडे जळणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे.डॉ.गणेश ढवळे, लिंबागणेशकर