Beed Fire News 
बीड

Beed Fire News | सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावर बीड मांजरसुंबा घाटात बर्निंग कारचा थरार...

सुदैवाने जीवित हानी टळली

पुढारी वृत्तसेवा

बीड : सोलापूर- धुळे राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या मांजरसुंबा घाटात बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. मंगळवारी (दि.3 जानेवारी) रात्री दहाच्या दरम्यान घाटामध्ये पेट्रोल कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने चालकाच्या सतर्कतेमुळे जीवित हानी टळली मात्र कार पूर्णपणे जळून खाक झाले आहे.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील वितेश खंडाळे हे पत्नी व दोन मुलांसह प्रवास करत होते. त्यांची गाडी मांजरसुंबा घाटात आल्यानंतर शॉर्टसर्किटमुळे धूर निघताच त्यांनी गाडी थांबवून सुरक्षित अंतरावर कुटुंबासह गेल्याने जीवित हानी टळली असली तरी या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी याच घाटामध्ये डिझेल टँकरला अपघात होऊन मोठी आग लागली होती त्यानंतर रात्री ही घटना घडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT