Caste Certificate Protest Pudhari
बीड

Beed news | जात प्रमाणपत्रासाठी टॉवरवर चढून स्टंटबाजी करणाऱ्या त्या इसमास SDO इंगोलेंची चपराक

अपुऱ्या कागदपत्रांमुळे खारीज केला अर्ज

पुढारी वृत्तसेवा

माजलगाव : कोळी महादेव जमातीचे जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी मोबाईल टॉवरवर चढून स्टंटबाजी करणाऱ्या धुनुकवाडीच्या त्या इसमाचा जात प्रमाणपत्राचा अर्ज उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांनी खारीज केला. अपुऱ्या कागदपत्रा आधारे जात प्रमाणपत्र बळकवणाऱ्या स्टंटबाजास ही इंगोले यांची चपराक मानली जात आहे.

महादेव कोळी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी धारूर तालुक्यातील धनुकवड येथिल भागीरथी सुखदेव गायकवाड यांनी उपविभागीय अधिकारी माजलगाव यांना अर्जाद्वारे मागणी केली होती. यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्राची यात कमी होती. परंतु उपविभाग्य अधिकारी जात प्रमाणपत्र देत नाहीत म्हणून गायकवाड यांनी मंगळवारी मोबाईलच्या टावरवर चढून स्टंटबाजी केली. परंतु जात प्रमाणपत्र हे ज्या त्या जातीचा अधिकार असून त्यासाठी आवश्यक कागद पत्राची पूर्तता करणे बंधनकारक आहे.

महादेव कोळी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गायकवाड यांनी दाखल केलेले कागदपत्र अपुरे असल्याने उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांनी त्यांचा अर्ज खारीज केला आहे. अपुऱ्या कागदपत्राधारे जात प्रमाणपत्र बळकाण्यासाठी स्टंटबाजी करणाऱ्याना ही चपराक मानली जात आहे. दरम्यान सदरील व्यक्तीस पोलिसांनी रात्रीच टॉवरवरून उतरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT