Gas Shortage Pudhari
बीड

Beed LPG cylinder shortage | गॅस तुटवड्याची झळ केजमध्ये : चिडलेल्या ग्राहकाने बुकिंग करणाऱ्या तरुणास केली मारहाण

पुरेसा गॅस साठा असल्याचे प्रशासनाकडून आवाहन तरीही ग्राहकांकडून गॅससाठी गर्दी

पुढारी वृत्तसेवा

केज :- केज येथे गॅस एजन्सीवर गॅस सिलेंडर घेण्यासाठी गेलेल्या तरुणास गॅसचे कार्ड आणि ओटीपी विचारल्याच्या कारणावरून त्याने गॅस एजन्सीवर काम करीत असलेल्या तरुणाला मारहाण केली आहे.

अमेरिका आणि इराण युद्धामुळे गॅस सिलेंडर घेण्यासाठी ग्राहक गर्दी करीत आहेत. प्रशासनाच्या वतीने गॅस आणि पेट्रोल डिझेल व इंधनाचा साठा भरपूर असल्याचे आवाहन करून देखील ग्राहक मात्र वाहनासाठीच्या सीएनजी गॅस आणि स्वयंपाकाच्या गॅससाठी गर्दी करीत आहेत.

दि. १४ मार्च रोजी रोजी केज येथील धारूर रोड लगत असलेल्या एच पी गॅस एजन्सीवर शहरातील एक ग्राहक इसम हा गॅस सिलेंडर घेण्यासाठी गेला असता गॅस एजन्सीजवर काम करीत असलेल्या आकाश बोराडे या तरुणाने त्यांच्या ग्राहकाकडे गॅसचे कार्ड आणि नोंदणीचा ओटीपीची मागणी केली. त्यामुळे चिडलेल्या गॅस ग्राहकाने आकाश बोराडे याला मारहाण केली.

या मारहाणीत आकाश बोराडे याच्या खांद्याला मार लागला आहे. त्या नंतर आकाश बोराडे याला प्रथमोपचारा संदर्भात पोलिसांनी पत्र देऊन उपजिल्हा रुग्णालय केज येथे पाठविले. तेथे त्याच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी स्वामी रामानंद ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे संदर्भीय उपचारासाठी हलविले आहे. अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नसून पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येत असल्याची माहिती मिळते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT