गौतम बचुटे
केज : तालुक्यातील डोका येथे जमीनीच्या वादातून झालेल्या भांडणात ७५ वर्षाच्या वृद्धाच्या तोंडावर बुक्की मारून दोन दात पाडले. तसेच त्यांच्या सून आणि मुलगा यांना देखील मारहाण करण्यात आली आहे.
केज तालुक्यातील डोका येथे (दि. १२ नोव्हेंबर) दुपटी १२:३० सर्व्हे नं. ३६३ मधील जमिनीत ७५ वर्ष वयाचे वृद्ध बकटं माधव चौरे हे गवत काढत असताना विश्वनाथ चौरे, प्रमोद चौरे, उषाबाई चौरे, अंजली चौरे हे त्यांना म्हणाले की, ही जमीन त्यांची असल्याने तुम्ही गवत काढू नका. त्यावर त्यांना बंकट चौरे म्हणाले की, कोर्टातील वाटणीपत्राआधारे ही जमीन आमची आहे. असे म्हणताच विश्वनाथ चौरे व प्रमोद चौरे यांनी त्यांच्या तोंडावर बुक्की मारून दोन दात पाडले. तर त्यांची सून आशाबाई चौरे हिला उशाबाई चौरे व अंजली चौरे या दोघींनी केसाला धरून मारहाण केली. तसेच त्यांचा मुलगा मधुकर चौरे याला सुद्धा विश्वनाथ चौरे आणि प्रमोद चौरे यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
बंकट चौरे यांच्या तक्रारी वरून विश्वनाथ चौरे, प्रमोद चौरे, उषाबाई चौरे आणि अंजली चौरे या चौघा विरुद्ध गु. र. नं. ६३०/२०२५ भा. न्या. सं. ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल तुकाराम मुरकुटे हे करीत आहेत.