केज येथील मजुराचा संशयास्‍पदरित्या मृत्यू झाला. 
बीड

बीड : केज येथील मजुराचा संशयास्‍पदरित्या मृत्यू

Beed Crime News | कुटुंबियांकडून तक्रारीवरुन पोलिसांत तक्रार दाखल

पुढारी वृत्तसेवा

केज : केज शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे मजूर म्हणून काम करीत असलेल्या एका मजुराचा उपचारा दरम्यान संशयितरित्या मृत्यू झालेला आहे. या बाबत युसुफवडगाव पोलीस ठाण्यात नातेवाईक जमा झालेले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज शहरातील क्रांती नगर भागातील शंकर बाळू मस्के वय (३० वर्ष) हा युवक केज येथील एका बांधकाम व्यावसायिक आणि बांधकाम गुत्तेदाराकडे स्लॅब टाकण्याच्या लिफ्ट मशीनवर बांधकाम मजूर म्हणून काम करीत होता. दि. १२ फेब्रुवारी रोजी तो बांधकाम व्यावसायिक व एका बांधकाम ठेकेदार यांच्याकडे युसुफवडगाव येथे स्लॅब भरण्याचे काम करीत असताना जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला असल्याने त्याच्यावर लातूर येथील खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या नंतर त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल केले होते. दि. १६ फेब्रुवारी त्याचा सकाळी १०:३० वा. अंबाजोगाई येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी त्याच्या कुटुंबियांच्या तक्रारी वरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात मजुराच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळते आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT