Kej tehsil office burn bullock cart
केज : बीड जिल्ह्यातील कोरडेवाडी (ता. केज) येथे सहा दिवसांपासून धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या राजश्री राठोड या उपोषणाला बसल्या आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून त्यांच्या उपोषण आणि मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.
त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी बाळराजे आवारे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केज तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढून तहसील कार्यालयाच्या आवारात बैलगाडीवर पेट्रोल टाकून पेटवून दिली. आंदोलकांनी कोरडेवाडी येथील साठवण तलाव मंजूर करावा. ज्ञानराधा बँकेच्या ठेवी परत देण्यात याव्या. तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि प्रति हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा मागण्यां केल्या आहेत.