केज पोलीस ठाण्यासमोर जीवन संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ऊसतोड मजुराला पोलिसांनी ताब्यात घेतले.  Pudhari Photo
बीड

केज पोलीस ठाण्यासमोर ऊसतोड मजुराचा जीवन संपविण्याचा प्रयत्न

Beed News | आर्थिक फसवणुकीतून कृत्य

गौतम बचुटे

केज: पुढारी वृत्तसेवा : ऊसतोड मजुराने केज पोलीस ठाण्यासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न आज (दि.२६) केला. मात्र, हा प्रकार लक्षात येताच अत्यंत चपळाईने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील जोला येथील पुष्पा मोहन ढाकणे आणि त्यांचे पती मोहन ढाकणे यांच्याकडे ट्रॅक्टर असून ते साखर कारखान्यावर ऊसतोडणी करून कुटुंबाची उपजीविका करतात. त्यांना तीन ऊसतोड मजूर देतो असे सांगून बाजीराव ढाकणे (रा. जोला, ता. केज) याने पुष्पा व मोहन ढाकणे यांच्याकडून १ लाख ४० हजार घेतले. मात्र त्या बदल्यात त्याने मजूर दिले नसल्याने ढाकणे पती-पत्नीने त्याच्याकडे पैशाची मागणी केली असता त्याने पैसे परत दिले नाहीत. त्यामुळे आज सकाळी १०. ३० च्या सुमारास पुष्पा व मोहन ढाकणे पोलीस ठाण्याच्या आवारात आले. त्यानंतर मोहन यांने पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात गोंधळ आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT