Nandurghat car bike collision
केज : केज तालुक्यातील नांदूरघाट रोडवर महावितरणच्या ३३ केव्ही उपकेंद्रासमोर मोटारसायकल आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलवरील बाप–लेक गंभीर जखमी, तर कारचालक किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना आज (दि. १५) दुपारी ४ च्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कार (MH-24/P-4001) चालवणारे रणजित हनुमंत गवळी हे शिरूरघाट येथून नांदूरघाटकडे जात होते. त्याचवेळी दुचाकी (MH-28/BP-1594) वरून संतोष राजा काळे (वय ३०) आणि त्यांचा मुलगा विशाल संतोष काळे हे दोघे केजकडे येत होते.
नांदूरघाटजवळील महावितरण उपकेंद्राजवळ कार आणि दुचाकीची जोरदार धडक झाली. यात संतोष काळे आणि त्यांचा मुलगा विशाल हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम नांदूरघाट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. कारचालक रणजित गवळी देखील जखमी असून त्यांच्यावर नांदूरघाट ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.