Beed Crime 
बीड

Beed Crime | व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत केजमध्ये अल्पवीन मुलीवर लैंगिक अत्याचार!

आई, वडील भावाला जीवे मारण्याची धमकी : आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

केज :- केज तालुक्यात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचाराची घटना उघडकीस आली. अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला घरी बोलावून तिच्या सोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच आई, वडील भावाला जीवे मारण्याची धमकी दिली.

केज शहरातील एका भागात राहत असलेली शालेय शिक्षण घेत असलेली १५ वर्ष १० महिने वयाच्या मुलीचा पंधरा दिवसापूर्वी दि. १४ एप्रिल रोजी दुपारी १:०० ते ३:०० वा. च्या दरम्यान एका नराधमाने पाठलाग करून तिला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देवून तिला त्याच्या राहते घरी बोलावुन घेतले. त्या नंतर त्याने त्या अल्पवयीन मुली सोबत बळजबरीने आणि जबरदस्तीने शारीरिक लैंगिक संबंध प्रस्थापित केले. सदर घटने बाबत कोणाला काही सांगितल्यास मुलीच्या आई-वडील व भावाला जिवे मारण्याची धमकी दिली.

तसेच मुलीच्या मोबाईलवर आरोपीने व्हिडीओ कॉल करुन त्याचे मोबाईलची स्क्रीन शेअर केली आणि त्याच्याकडे असलेल्या पेनड्राईव्ह मधील बळजबरीने लैगींक अत्याचार केलेला व्हिडीओ दाखवला. तसेच आता सांगेल तसे कर. असे म्हणुन कपडे काढ म्हणाला, परंतु तिने नकार दिला असता व्हिडीओ व्हॉयरल करण्याची धमकी दिली.

त्या नंतर दि. २ मे रोजी पीडितेच्या तक्रारी वरून केज पोलिस ठाण्यात रेहान रियाज शेख याच्या विरुद्ध गु. र. नं. २५८/२०२६ भा. न्या. सं. ७४, ७५, ७६, ७८(१), ७९, ६४(२) (i), ६५(१), ३५१(२) (३) आणि पोक्सोचे कलम ४, ६, ८, १०, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत.

आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी :- या गुन्ह्यातील आरोपी रेहान शेख यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्याला ६ मे पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT