प्रोफेसर डॉ. सुनील तपसे Pudhari
बीड

Beed News | आजारपणाला कंटाळून वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकाने जीवन संपविले

चंदन सावरगाव (ता. केज) येथील घटनेने हळहळ

पुढारी वृत्तसेवा

Kej medical college professor ends life

अंबाजोगाई : चंदन सावरगाव (ता. केज) येथील रहिवासी तथा बिदर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रोफेसर डॉ. सुनील तपसे (वय 57) यांनी बिदर येथे राहत्या घरी जीवन संपविले. ही दुर्दैवी घटना मंगळवारी ( दि. 3) दुपारी उघडकीस आली.

प्राथमिक माहितीनुसार आजाराला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. कर्नाटक मधील बिदर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये काही काळ अधिष्ठाता व नंतर त्याच महाविद्यालयामध्ये न्याय वैद्यक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून तपसे यांनी काम पाहिले.

आज (दि. 4) सकाळी दहा वाजता चंदन सावरगाव येथे त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी व एकुलता एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT