cash Theft News  (Pudhari Photo)
बीड

Beed Theft News | चहा पिण्यासाठी थांबले, ४ लाखाला मुकले; घाटेवाडी येथील चुलत भावांना निष्काळजीपणा भोवला

मस्साजोग येथे दुचाकीला अडकवलेली पैशांची पिशवी चोरट्यांनी केली लंपास

गौतम बचुटे

Kej Massajog 4 lakh rupees bag stolen

केज : केज तालुक्यातील घाटेवाडी येथील किरण शिवाजी धुमक यांना निष्काळजीपणाचा फटका बसला. बँकेतून तब्बल चार लाख रुपये काढून गावाकडे जात असताना थोडा वेळ चहा पिण्यासाठी थांबले असता, मोटारसायकलच्या हँडलला अडकवलेली पैशांची पिशवी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.

२८ ऑगस्ट रोजी दुपारी किरण धुमक व त्यांचा चुलत भाऊ प्रदीप धुमक हे दोघे मोटारसायकलने गावाकडे जात होते. प्रवासादरम्यान त्यांनी औषध खरेदीसाठी थोडा वेळ थांबले. त्यानंतर संध्याकाळी मस्साजोग येथे ‘चहा प्रेमी’ हॉटेल समोर मोटारसायकल उभी करून किरण धुमक यांनी पैसे असलेली पिशवी हँडलला अडकवली आणि दोघेही चहा पिण्यास गेले. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी हिरव्या रंगाची कापडी पिशवी चोरून नेली.

चोरीचा प्रकार उघड झाल्यानंतर त्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र काहीच निष्पन्न झाले नाही. किरण धुमक यांनी केज पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जावेद कराडकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.

निष्काळजीपणा भोवला

एवढी मोठी रक्कम हँडलला अडकवून ठेवणे ही गंभीर चूक ठरली असून या निष्काळजीपणामुळे किरण धुमक यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT