Molestation Case Pudhari Photo
बीड

Kej Crime | केज तालुक्यात आंतरजातीय विवाह केलेल्या तरुणीचा विनयभंग

केज तालुक्यात पिसेगाव फाटा परिसरातील घटनेने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Kej Taluka Molestation Case

केज: केज तालुक्यात आंतरजातीय विवाह केलेल्या एका तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. ११) सकाळी पिसेगाव फाटा परिसरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आदिवासी समाजातील एका तरुणीने सहा वर्षांपूर्वी उच्चवर्णीय तरुणासोबत आंतरजातीय विवाह केला असून दोघेही सध्या एकत्र राहत आहेत. रविवारी (दि. ११) हे दाम्पत्य गावाहून केज येथे खरेदीसाठी दुचाकीवरून येत होते.

दरम्यान, पिसेगाव फाट्याजवळील मानवलोक कार्यालयासमोर त्यांच्या परिचयातील एका व्यक्तीने हात दाखवून त्यांना थांबविले. पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून आलेल्या बाळू थोरात यांनी संबंधित महिलेबाबत जातीवाचक आणि अश्लील वक्तव्य करत तिच्या पतीशी वाद घातला. यावेळी महिलेच्या पतीने विरोध दर्शविल्यानंतर आरोपीने संबंधित महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात बाळू थोरात याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५, ३५१(२), ३५२, ३५६ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास प्रभारी पोलिस उपअधीक्षक ऋषिकेश शिंदे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT