Kej Marital Harassment Case  Pudhari
बीड

Beed Crime | पतीकडून इच्छेविरुद्ध अनैसर्गिक कृत्य व छळ; सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

केज तालुक्यात धक्कादायक घटना समोर

पुढारी वृत्तसेवा

Kej Marital Harassment Case

केज : केज तालुक्यातील एका गावातील विवाहित महिलेने पतीकडून इच्छेविरुद्ध अनैसर्गिक संबंध करण्यास भाग पाडले जात आहे. तसेच दहा लाख रुपयांची मागणी करून शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत असल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पतीसह सासू, सासरे, दोन नंदा व इतर अशा सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, पीडित महिलेचा पती तिला वारंवार जबरदस्तीने अनैसर्गिक पद्धतीने संबंध करण्यास भाग पाडत असून फ्लॅट खरेदीसाठी माहेरहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी करीत होता. यास नकार दिल्यास तिच्यावर मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. तसेच सासरच्या कुटुंबातील इतर सदस्यही पैशाच्या मागणीसाठी तिचा छळ करीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ५२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ८५, ६४, ११५(२), ३५१(२), ३५२ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT