शेतातील ढोबळी मिरचीच्या पिकात शेळ्या व मेंढ्या सोडून दिल्या  Pudhari
बीड

Beed News | शेतकऱ्याची हतबलता: ढोबळी मिरचीला भाव नसल्याने पिकांत सोडल्या शेळ्या, मेंढ्या

केज तालुक्यातील एका शेतकऱ्याची हतबल करणारी परिस्थिती समोर आली आहे

पुढारी वृत्तसेवा

Kej taluka Shimla Mirch price drop

केज: तालुक्यातील एका शेतकऱ्याची हतबल करणारी परिस्थिती समोर आली आहे. देशमुख नावाच्या या शेतकऱ्याने मोठ्या अपेक्षेने सुमारे पाच एकर क्षेत्रावर ढोबळी मिरचीची लागवड केली होती. बाजारात चांगली मागणी आणि दर मिळत असल्याने त्यांनी मोठ्या मेहनतीने पिक जोपासले होते.

मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावाचा परिणाम भाजीपाला बाजारावर झाला. यामुळे ढोबळी मिरचीसह इतर शेतमालाचे दर घसरले. परिणामी, तयार झालेल्या पिकाची तोडणी करणेही खर्चिक ठरू लागले.

या परिस्थितीमुळे निराश झालेल्या शेतकऱ्याने अखेर आपल्या शेतातील ढोबळी मिरचीच्या पिकात शेळ्या व मेंढ्या सोडून दिल्या आहेत. ही घटना सध्याच्या कृषी संकटाचे आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचे जिवंत उदाहरण ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT