रामकिशन उर्फ अण्णा चौरे Pudhari
बीड

Beed Farmer Electrocution | शेतात काम करताना विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील घटना, विडा येथील रुग्णालयात शवविच्छेदन

पुढारी वृत्तसेवा

Kaij Farmer Death

केज : केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे शेतात काम करत असताना विजेच्या वायरचा स्पर्श होऊन ३८ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री घडली. रामकिशन उर्फ अण्णा लक्ष्मण चौरे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामकिशन चौरे हे मंगळवारी रात्री जिवाचीवाडी येथील आपल्या शेतात काम करीत होते. त्यावेळी अचानक विजेच्या वायरचा स्पर्श झाल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. या दुर्घटनेत ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने विडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

त्यानंतर विडा येथील रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यामध्ये विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

रामकिशन चौरे हे मनमिळाऊ स्वभावाचे आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीय आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन भाऊ, दोन बहिणी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास विडा बीटचे अंमलदार उमेश आघाव करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT