नितीन चाटे Pudhari
बीड

Kaij Accident | केजमध्ये टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

केज शहरातील धारूर रोडवरील भवानी चौकात भीषण अपघात

पुढारी वृत्तसेवा

Kaij Tipper Bike Collision

केज : केज शहरातील धारूर रोडवरील भवानी चौकात गुरुवारी (दि. २३) सकाळी झालेल्या भीषण अपघातात टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास धारूरकडून मुरूम घेऊन येणारा टिप्पर (क्र. एमएच ४४/यू ९९७१) अंबाजोगाईकडे जाण्यासाठी डावीकडे वळत होता. त्याचवेळी तांबवा येथील नितीन आदिनाथ चाटे (वय ३५, रा. तांबवा, ता. केज) हे दुचाकी (क्र. जीए ०३/एए ८१२८) वरून त्याच दिशेने जात असताना टिप्परची धडक बसली.

धडकेनंतर नितीन चाटे हे टिप्परच्या मागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेले शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे सय्यद माजेद यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. तसेच टिप्पर चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने, बाळासाहेब रोडे, शकील शेख, हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे तसेच शिवाजी कागदे, सिद्दिक शहा, त्र्यंबक सोपने आणि नितीन वारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT