Molestation Pudhari
बीड

Beed Crime : केजमध्ये संतापजनक घटना! महिलेचा विनयभंग करून नराधमाकडून शरीरसुखाची मागणी

केज पोलिसात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

केज : केज तालुक्यातील एका गावात आपल्या बाळाला स्तनपान करत असलेल्या २० वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने केवळ विनयभंगच केला नाही, तर शरीरसुखाची मागणी करून जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी (दि.९) केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत विवाहित महिला सध्या आपल्या माहेरी वास्तव्यास आहे. ८ मे रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास ती आपल्या लहान मुलीला घरात स्तनपान करत बसली होती. यावेळी आरोपी कृष्णा श्रीराम आरडे (ता. केज) दारूच्या नशेत घरात घुसून तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या सोबत लज्जास्पद कृत्य केले. त्याने विवाहितेकडे शरीर सुखाची मागणी केली आणि जर ती पूर्ण केली नाही तर तुला ठार मारेन, अशी धमकीही दिली. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून कृष्णा आरडे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT