Beed Accident | पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ५ जणांना एसटी बसने चिरडले; तिघांचा जागीच मृत्यू  file photo
बीड

Beed Accident | पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ५ जणांना एसटी बसने उडवले; तिघांचा जागीच मृत्यू

बीड-परळी महामार्गावर घोडका राजुरी फाट्यावरील घटना

पुढारी वृत्तसेवा

बीड : बीड-परळी महामार्गावर बीड-परभणी एसटी बसने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच जणांना धडक दिली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी आहेत. बीडजवळ घोडका राजुरी येथे आज सकाळी ही घटना घडली. अपघातात ठार झालेले तिघेही घोडका राजुरी येथील आहेत.

सुबोध (बालू) बाबासाहेब मोरे (वय २०), विराट बब्रूवान घोडके (वय १९), ओम सुग्रीव घोडके (वय २०) अशी मृत तरूणांची नावे आहेत. बीड -परळी महामार्गावर घोडका राजुरी फाटा नजीक रस्त्याच्या कडेला पाच तरुण पोलिस भरतीची तयारी करत होते. यावेळी परभणी बसने पाचही तरूणांना उडविले. यातील दोघांनी वेळीच उड्या मारल्याने ते बचावले. मात्र तिघे अपघातात जागीच ठार झाले. तिन्ही मृत तरूणांना जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT