Gevrai Youth Ends Life Pudhari
बीड

Gevrai Youth Death | गेवराईत तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविले

गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Gevrai Youth Ends Life

गेवराई : शहरातील शासकीय विश्रामगृहाजवळील राहत्या घरी ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविले. ही दुर्दैवी घटना सोमवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

अर्जुन बाबासाहेब मोरे असे मयत तरुणाचे नाव असून, त्याच्या पश्चात आई, बहीण, पत्नी व लहान मुलांचा परिवार आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री ही घटना उघडकीस आली. घरातील सदस्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, अर्जुन मोरे यांनी टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT