Durdana Begum Farooqui (Pudhari Photo)
बीड

Gevrai NCP Candidate Death | गेवराई नगर पालिका निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या उमेदवार दुरदाना बेगम फारुकी यांचे निधन

Gevrai Municipal Election | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये शोककळा

पुढारी वृत्तसेवा

Gevrai NCP Candidate Passed Away

गेवराई: गेवराई नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रभाग क्रमांक ११ ‘अ’ च्या अधिकृत उमेदवार दुरदाना बेगम सलीमोद्दीन फारुकी यांचे बुधवारी (दि.२६) सकाळी निधन झाले. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत ही घटना घडल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर निवडणूक तयारीच्या पार्श्वभूमीवर त्या कार्यकर्त्यांशी समन्वय साधत होत्या. परंतु अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकस्मात निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

त्यांच्या निधनानंतर निवडणूक प्रक्रियेवर काय परिणाम होणार याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. निवडणूक विभागाच्या वतीने लवकरच अधिकृत भूमिका स्पष्ट केली जाण्याची शक्यता असून निवडणूक आयोगाला मार्गदर्शन मागितले असल्याचे नायब तहसीलदार संजय सोनवणे यांनी सांगितले. फारुकी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून विविध राजकीय, सामाजिक व्यक्तींनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT