गेवराईः गेवराई तालुक्यातील कोपरा येथून पाचेगाव येथे जात असताना एका कारचालकाने कट मारल्याने व कुत्रा आडवा आल्याने दुचाकीस्वार अचानक ब्रेक लावल्यामुळे रस्त्यावर आपटला. यामध्ये दुचाकीवरील दोघांच्या मेंदुला गंभीर दुखापत झाली या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील पाचेगाव रोडवरील वसंत नगर तांडा परीसरात दि.२१ रोजी घडली होती.
गेवराई तालुक्यातील कोपरा येथील श्रीराम आजिनाथ मते वय 35 वर्ष व पुरुषोत्तम संतराम मते वय ६५ वर्ष हे दोघे दुचाकीवरून पाचेगाव येथे जात असताना वसंतनगर तांडा जवळपास एका इंडिका चालकाने समोरून कट मारला व यावेळी अचानक कुत्रा आडवाल्याने श्रीराम मते यांनी दुचाकीचे ब्रेक दाबल्याने दोघे रस्त्यावर पडले.
दोघांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती यावेळी त्यांना परिसरातील नागरिकांनी बीड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर व पुन्हा नंतर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
दरम्यान दिनांक २३ रोजी पहाटेच्या सुमारास श्रीराम मते यांचे निधन झाले असून त्यानंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पुरुषोत्तम संतराम मते यांचे निधन झाले दोघावरही गावातील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान श्रीराम मते यांची पाचेगाव येथे पानटपरी असून ते पानटपरी उघडण्यासाठी जात होते त्यांच्या पश्चात पत्नी ,भाऊ आई-वडील एक मुलगा असा परिवार आहे. तर पुरषोत्तम मते यांना कुत्रा चावला असल्याने ते लस घेण्यासाठी निपाणी जवळका येथे जाणार होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, सुना, नातवंडे, भाऊ, बहिणी असा परिवार आहे.