प्रातिनिधीक फोटो  (File Photo)
बीड

Beed Bribe | ७० हजारांची लाच घेताना तलाठी रंगेहात 'लाचलुचपत'च्या जाळ्यात

गेवराई तालुक्यातील म्हाळजपिंपळ येथे अनधिकृत वाळू उपसा व हायवा वाहतुकीला परवानगी देण्यासाठी मागितली लाच

पुढारी वृत्तसेवा

Georai Talathi Bribe Case

गेवराई : तालुक्यातील म्हाळजपिंपळ येथे अनधिकृत वाळू उपसा व हायवा वाहतुकीला सुरळीतपणे परवानगी देण्यासाठी लाच मागितली, याप्रकरणात तलाठी संघटनेचे अध्यक्ष तथा तलाठी विजय मोराळे यांना छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि.१८) ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे गेवराईच्या महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

म्हाळजपिंपळ परिसरात अनधिकृत वाळू उपसा करण्यासाठी केन्या व हायवा वाहनांची वाहतूक सुरळीत करून देण्यासाठी तलाठी विजय मोराळे यांनी तक्रारदाराकडे तब्बल १ लाख ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याबाबत तक्रारदाराने छत्रपती संभाजीनगर येथील एसीबी कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. त्यानुसार गेवराई शहरातील बेदरे कॉम्प्लेक्स परिसरातील एका खासगी कार्यालयात ७० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना तलाठी विजय मोराळे यांना पथकाने रंगेहात पकडले.

या कारवाईनंतर महसूल विभागात एकच खळबळ उडाली असून, संबंधित प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT