बीड

बीड: माजलगाव येथील कार्यकारी अभियंता २८ हजारांची लाच घेताना ‘एसीबी’च्या जाळ्यात

अविनाश सुतार

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती काढून शेतात टाकण्यासाठी २८ हजारांची लाच घेतना माजलगाव पाटबंधारे विभागाच्या परळी येथील कार्यकारी अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात आले. राजेश आनंदराव सलगरकर असे  कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (दि.२२) केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार व साक्षीदार आणि गावातील त्यांचे 5 सहकारी शेतकरी यांनी चिंचोटी तलावातील बुडीत क्षेत्रातील गाळ व माती काढून शेतात टाकण्यासाठी माजलगाव पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात परवानगी मिळण्यासाठी अर्ज केला होता.  सलगरकर यांनी तक्रारदार व साक्षीदार यांना गाळ व माती काढण्याची परवानगी देण्यासाठी प्रत्येकी ५ हजार प्रमाणे ७ शेतकऱ्यांकडे ३५ हजारांची मागणी केली होती. तडजोडीअंती २८ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यावरुन आज माजलगाव पाटबंधारे विभागाच्या परळी वैजनाथ येथील कार्यालयात एसीबीने सापळा रचला. सलगरकर यांनी पंचा समक्ष लाच रक्कम २८ हजार  स्वीकारताच लाच रकमेसह त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध परळी वैजनाथ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

ही कारवाई  छत्रपती संभाजीनगर लाचलुचपतचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक युनूस शेख, पर्यवेक्षण अधिकारी शंकर शिंदे, पोलीस निरीक्षक गुलाब बाचेवड, सुरेश सांगळे, श्रीराम गिरम ,अविनाश गवळी, भरत गारदे, अमोल खरसाडे, अंबादास पुरी, स्नेहल कुमार कोरडे,
गणेश म्हेत्रे यांच्या पथकाने केली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT