बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले. file photo
बीड

बीड : बडतर्फ कासलेंच्या बेताल विधानांची निवडणूक विभागाने घेतली गंभीर दखल

बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले विरुद्ध निवडणूक विभागाने परळीत केला गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ : गेल्या काही दिवसांपासून सोशल माध्यमातून बेताल व निराधार वक्तव्ये करणारा बीड पोलीस दलातील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले यांने परळी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भाने व ईव्हीएम मशीनच्या छेडछाडी बाबतचे संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य केले होते. या अनुषंगाने आता निवडणूक विभागाने त्याच्या विरुद्ध परळी येथील संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, परळी येथील निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अण्णा वंजारे यांनी बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले यांनी भारताचे निवडणूक आयोग व शासनाची निराधार व बेताल वक्तव्य करून बदनामी केली. लोकसेवक असताना जाणिवपुर्वक भारताचे सार्वभौमत्ता व सुरक्षा धोक्यात येईल अशी खोटी वक्तव्ये केली. तसेच माझ्या बँकेच्या खात्यावर दि. 21 नोव्हेंबर 2024 रोजी 10 लाख रुपये आले आहेत. हे पैसे परळी विधानसभा निवडणुक प्रक्रियेतील EVM मशीन पासुन दुर राहणे व EVM मशीन मध्ये जी काही छेडछाड होईल त्यासाठी गप्प बसायचे व सहन करायंच, असे वक्तव्य केले. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेविषयी व निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धती विषयी नागरिकात संभ्रम निर्माण होऊ शकतो.

निवडणुक आयोगाच्या व राज्य सरकारच्या लौकीकास जनमानसात बाधा होईल अशा उध्देशाने वक्तव्य केले आहे. वास्तविक पाहता अतिशय काटेकोरपणाने निवडणूक प्रक्रिया पार पडलेली असताना विविध समाज माध्यमांमधून सातत्याने ईव्हीएम छेडछाड व हे सरकार या इव्हिएम छेडछाडीतूनच आलेले आहे. अशा पद्धतीची विधाने करून संभ्रम निर्माण करण्यास कारणीभूत ठरले. या आशयाच्या फिर्यादीवरून आरोपी बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे,पोलीस.उपनि.राठोड हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT