Crime News pudhari photo
बीड

Beed Crime | पवनचक्कीच्या कामात अडथळा आणत 10 लाखांच्या खंडणीची मागणी

नेकनूर पोलीस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

नेकनूर : बीड तालुक्यातील बाळापूर शिवारात सुरू असलेल्या पवनचक्की प्रकल्पाच्या कामात अडथळा आणून कंपनीकडे 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कामगारांना धमकावून क्रेनसह अन्य यंत्रसामग्रीचे काम बंद पाडल्याच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टोटल सोलर पॉवर लिमिटेड कंपनीने बाळापूर येथील गट क्रमांक 309 मधील जमीन पवनचक्की प्रकल्पासाठी भाडेतत्त्वाने घेतली आहे. जमिनी बाबत महसुली नोंदी आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कंपनीने इन्क्रा प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून प्रकल्प उभारणीचे काम सुरू केले होते.या दरम्यान कंपनीच्या कामात अडथळा निर्माण करून 10 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. काम न थांबवल्यास यंत्रसामग्रीचे नुकसान करण्याची धमकीही देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी कंपनीच्या तक्रारीवरून नेकनूर पोलिसांनी महादेव बाजीराव जाधव, कृष्णा महादेव जाधव, गणेश महादेव जाधव, अविनाश परमेश्वर जाधव (सर्व रा. बाळापूर), सीमा विशाल अंधारे (रा. भांडगाव, ता. भूस), सोपान मोरे (रा. बीड) यांच्यावर नेकनूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT