Vilas Ghule Murder Case 
बीड

Vilas Ghule Murder Case : विलास घुले हत्या प्रकरणी दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

उर्वरित ६ आरोपींची कोठडी मंगळवारी संपणार

पुढारी वृत्तसेवा

केज : बीड जिल्ह्यातील टाकळी (ता. केज) येथील विलास घुले हत्या प्रकरणात रविवारी अटक केलेल्या दहाव्या आरोपीसह पोलीस कोठडीची मुदत संपलेल्या एका आरोपीस सोमवारी (दि.२९) न्यायालयात हजर केले असता दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपी सूरज उर्फ भैय्यासाहेब गायकवाड याच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपली होती. तर एसआयटीने तपासातून दहावा आरोपी राजकुमार मोरे (रा. सोनीजवळा) यास रविवारी दुपारी लातूर येथून ताब्यात घेतले होते. सोमवारी दुपारी सूरज उर्फ भैय्यासाहेब गायकवाड व राजकुमार मोरे या दोघांना न्यायालया समोर हजर केले. न्यायालयाने या दोघांना २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. उर्वरीत सहा आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवार (दि. ३०) पूर्ण होत असल्याने त्यांना न्यायालया समोर हजर केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT