Thane Crime pudhari photo
बीड

Beed Crime : दिवाळीच्या सुटीनंतर घरी परतताच चोरी उघडकीस!

शिक्षिकेच्या घरातून 65 हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने लंपास

पुढारी वृत्तसेवा

दिंद्रुड : दिवाळीच्या सुटीनिमित्त गावी गेलेल्या एका सहशिक्षिकेच्या बंद घराचे कुलूप कटरने कापून चोरट्यांनी चोरी केल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. या चोरीत 65 हजार रुपये रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.

दिंद्रुड येथील चाटगाव रस्त्यावर सहशिक्षक वशिष्ठ चव्हाण यांच्या घरात जालना जिल्ह्यातील परतूर येथील नम्रता अनिल खंदारे या सहशिक्षिका भाड्याने राहतात. दिवाळीच्या सुटीनिमित्त त्या गावी गेल्या होत्या. सोमवारी शाळा सुरू होणार असल्याने रविवारी सायंकाळी त्या दिंद्रुड येथे परतल्या. यावेळी घराच्या दरवाजाची कडी-कोंडी कटरने कापलेल्या अवस्थेत आढळली.

घरात प्रवेश केल्यानंतर सामानाची नासधूस व वस्तूंची फेकाफेक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घराची पाहणी केली असता 65 हजार रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT