गेवराई ; गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका तांडा येथे जुन्या वादातून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत ७ महिन्यांच्या गरोदर महिलेसह ७५ वर्षीय वृद्धाला निर्दयीपणे मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी १७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका तांडा येथे जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या प्रकरणी १७ जणांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या हल्ल्यात ७५ वर्षीय वृद्ध शेतकरी दामोधर हरीभाऊ राठोड यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील महिला आणि एका सात महिन्यांच्या गरोदर महिलेलाही निर्दयीपणे मारहाण करण्यात आल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दामोधर राठोड (वय ७५) हे आपल्या मुलीच्या घरासमोर बसलेले होते.
यावेळी गावातीलच पापा रोहीदास चव्हाण, रमेश रोहीदास चव्हाण, उमेश रोहीदास चव्हाण, पिंटू सुर्यभान चव्हाण यांच्यासह अन्य काही जण मद्यधुंद अवस्थेत त्या ठिकाणी आले. नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या एका घटनेचा आणि जुन्या भांडणाचा राग मनात धरून या टोळक्याने दामोधर राठोड यांना विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कुऱ्हाड आणि लाकडी दांड्यांनी हल्ला केला.
राठोड यांनी विचारणा केली असता, आम्ही तुमचा एक माणूस मारला आहे, आता तुला आणि तुझ्या नातवालाही जिवंत सोडणार नाही," अशी धमकी देत आरोपींनी हल्ला चढवला. यावेळी आरोपींनी दगड, लाकडी दांडे आणि कुऱ्हाडीचा वापर करून दामोधर यांना बेदम मारहाण केली.
गरोदर महिलेलाही सोडले नाही
भांडणाचा आवाज ऐकून दामोधर यांची मुलगी शांताबाई, सून यशोदा, नात शिवकन्या आणि नातू निलेश हे सर्वजण भांडण सोडवण्यासाठी धावून आले. मात्र, आरोपींनी त्यांनाही लक्ष्य केले. विशेष म्हणजे, फिर्यादी यांची नात प्रियंका चव्हाण ही सात महिन्यांची गरोदर असतानाही तिला रमेश चव्हाण याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवकन्या चव्हाण हिला मारहाण करून तिचे कपडे फाडून विनयभंग केल्याचा गंभीर आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.
कुऱ्हाड आणि लाकडी दांड्यांनी हल्ला
राठोड यांनी विचारणा केली असता, आम्ही तुमचा एक माणूस मारला आहे, आता तुला आणि तुझ्या नातवालाही जिवंत सोडणार नाही," अशी धमकी देत आरोपींनी हल्ला चढवला. यावेळी आरोपींनी दगड, लाकडी दांडे आणि कुऱ्हाडीचा वापर करून दामोधर यांना बेदम मारहाण केली.
या घटनेनंतर दामोधर राठोड यांनी गेवराई पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. त्यांच्या तक्रारीवरून पापा चव्हाण, रमेश चव्हाण, उमेश चव्हाण, पिंटू चव्हाण, अशोक चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, आनसाबाई चव्हाण आणि रोहीदास चव्हाण यांच्यासह एकूण १७ जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे प्रकरण परस्परविरोधी असल्याने पोलिसांनी दोन्ही बाजूंची दखल घेतली असून, गेवराई पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.