Beed Crime | नऊ वर्षीय बालिकेवर नराधम वृद्धाकडून अत्याचार  Pudhari File Photo
बीड

Minor girl sexual assault | नऊ वर्षीय बालिकेवर नराधम वृद्धाकडून अत्याचार

पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून दिंद्रुड पोलिसात गुन्हा नोंद

पुढारी वृत्तसेवा

दिंद्रुड: चॉकलेट देतो म्हणून एका वयोवृद्ध इसमाने नऊ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना दि.२८ रोजी माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीतील एका वाडीत घडली. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून दिंद्रुड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस तात्काळ जेरबंद करत बीड जिल्हा कारागृहात त्याची रवानगी केली.

पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार, धारूर तालुक्यातील एका वाडीत एक शेतमजूर कुटुंब राहते, त्यांची इयत्ता चौथीत शिकणारी नऊ वर्षीय मुलगी दि.28 रोजी सकाळी शाळेत जात असताना, मैत्रिणीला भेटण्यासाठी गेली, रस्त्यातच आरोपी बाबुराव केरबा निरडे याने तिला चॉकलेट देतो म्हणून घरात बोलावून घेतले.

घराची कडी आतून लावून मुलीच्या अंगावरील सर्व कपडे काढून तिच्यावर अत्याचार केला, मुलगी ओरडत असताना ही तिची दया माया केली नाही, त्यानंतर मुलगी शाळेत गेली, घरी आल्यापासून ती शांत शांत राहत असल्याने दि.२९ रोजी आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने घडलेली सर्व आपबिती सांगितली.

दरम्यान या किळसदायक घटनेत दिंद्रुड पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता (बी.एन.एस)२०२३ व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत विविध कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत अंबाजोगाई येथून फरार आरोपीस जेरबंद केले असून सेशन कोर्टात दाखल करत आरोपी बाबुराव निरडेची बीड जिल्हा कारागृहात रवानगी केल्याची माहिती सपोनि महादेव ढाकणे यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT