बीड

तांबवा येथे चार ठिकाणी घरफोडी, दागिन्यांसह ३ लाख ३३ हजाराचा ऐवज लांबविला

घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांचे पथक

पुढारी वृत्तसेवा

गौतम बचुटे

केज : तालुक्यातील तांबवा येथे अज्ञात चोरट्यांनी चार ठिकाणी घरफोडी करीत रोख २ लाख ३६ हजार रु. आणि सोन्याच्या दागिन्यासह ३ लाख ३४ हजाराचा ऐवज लांबविला आहे. २५ एप्रिल रोजी मध्यरात्री १:०० ते ३:०० वाजेच्या दरम्यान तांबवा (ता. केज) येथे २५ एप्रिल रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शंकर भगवानराव चाटे यांच्या घरात प्रवेश केला.

घरातील ९० हजार रुपये किंमतीचे दीड तोळ्याची बोरमाळ, एक तोळ्याचे गंठण, पाच ग्रॅमचे झुंबर व त्यांचे भाऊ शिवाजी चाटे यांनी शेतीमाल विक्रीचे ठेवलेले २ लाख रुपये असा २ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी माणिक यशवंत चाटे यांच्या घरी गेले. त्यांच्या घरातील शेतीमाल विक्रीचे २५ हजार रुपये व दीड हजाराची घड्याळ घेऊन सखाराम जनार्धन चाटे यांच्या घरी गेले. त्यांच्या घरातील नगदी पाच हजार रुपये घेऊन चोरटे आशाबाई भिमराव चाटे यांच्या घरात गेले. त्यांच्या घराची झडती घेऊन नगदी ६ हजार रुपये व सहा हजार रुपयांचे सोन्याचे मणी घेऊन चोरट्यांनी गावातून पोबारा केला.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांचे पथक पाचारण करण्यात आले होते. शंकर चाटे यांच्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यां विरुद्ध गु. र. नं. २३९/२०२६ भा. न्या. सं. ३०५(ए), ३३१(४) नुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT