Accident News Pudhari
बीड

Beed accident | परळीत भरधाव ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; ट्रक चालकावर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ : परळी ते गंगाखेड रोडवरील उड्डाणपुल परिसरात शनिवारी (११ एप्रिल) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एका भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत २९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सचिन सुधाकर सटाले (वय २९, रा. तडोळी, ता. परळी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील माणिक रामकृष्ण सटाले यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास परळी ते गंगाखेड रोडवरील एकमिना चौक ते उड्डाणपुल दरम्यान हा अपघात घडला.

आरोपी ट्रक चालक दाऊद मोहम्मद शेख (रा. मलीकपुरा, परळी) हा आपल्या ताब्यातील ट्रक (क्र. MH44 U 0619) भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत होता. या ट्रकने सचिन याच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे सचिनचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनीट्रक चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम २८१ आणि १०६(१) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक ढोणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT