assault case file photo
बीड

तीन वर्षाच्या मुलीवर ६५ वर्षाच्या नराधमाकडून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

संशयित आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे

पुढारी वृत्तसेवा

गौतम बचुटे

केज : तालुक्यातील एका गावात तीन वर्षाच्या एका निरागस मुलीला घरात कोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी एका ६५ वर्षाच्या नराधमाविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तालुक्यातील काळेगाव घाट येथे आई शेतात कामाला गेली होती. दरम्यान घरात एक 3 वर्षाची लहान मुलगी आणि तिचा 7 वर्षाचा भाऊ हे वृद्ध आजी आणि आजारी असलेल्या वडिलांजवळ होते. दोघे बहीण भाऊ घरच्या बाहेर खेळत असताना ६५ वर्षाचा दारू पिलेला इसम शाहु काशीबा दुनघव हा त्या लहान मुलीला त्याच्या घरात घेऊन गेला.

मुलगी आपल्या घरी दिसत नसल्याने आजी व वडिलांनी तीचा शोध घेतला असता ती लहान मुलगी ही शाहु काशीबा दुनघव याचे घरात टेबलाच्या खाली बसली असल्याचे आढळून आले. वडील आणि आज्जीला पाहून मुलगी घाबरून रडत होती आणि तिच्या अंगावर असलेली पॅन्टची एक बाजू पायातुन बाहेर काढलेली होती. त्यानंतर त्या लहान मुलीने घडलेला प्रसंग तिच्या आईला सांगितला.

मुलीच्या आईच्या तक्रारीवरून नराधम आरोपी शाहू कशीबा दुनघव याच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु र नं २८६/२०२६ भा न्या सं ७४, ७६ यासह पोक्सोचे कलम ८, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होताच आरोपी शाहू दुनघव याला पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल तुकाराम मुरकुटे यांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपीला तीन दिवसाची पोलिस कोठडी (दि. १३) मे रोजी नराधम आरोपी शाहू दुनघव याला दि. १५ मे रोजी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT