Beed Crime News : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण File Photo
बीड

Beed Crime News : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण

ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून काम करीत असलेल्या तरुणाने अपहरण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Abduction of a minor girl under the pretext of marriage

गौतम बचुटे/केज : केज तालुक्यातील एका गावातून नववीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील भोपला येथील ज्ञानेश्वर माउली विद्यालाय पिंपरी ता. केज जि. बीड येथे नववीच्या वर्गात शिक्षण घेत असलेलेली मुलगी ही दि. २७ मे रोजी पहाटे तिच्या खोलीत आढळून आली नाही. तिच्या आईवडिलांनी तिचा आप्तेष्ट व नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला असता ती आढळून आली नाही. त्‍यामुळे एकच खळबळ उडाली.

दरम्यान या अल्पवयीन मुलीचे धाराशिव जिल्ह्यातील हसेगाव (केज) येथील कुंदन सुखदेव साळवे या ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून काम करीत असलेल्या तरुणाने अपहरण केले आहे. या मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिचे अपहरण केले आहे अशी तक्रार अपहरण झालेल्या मुलीच्या वडीलांनी केली आहे.

या प्रकरणी संबंधित तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुकुमार ऊर्फ राकेश बनसोडे हे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT