Beed Crime News : Chain thieves active
आष्टी, पुढारी वृत्तसेवा आष्टी तालुका व शहरात सोनसाखळी लुटीच्या घटनांनी अक्षरशः डोके वर काढले असून नागरिकांमध्ये भीतीचे सावट गडद होत चालले आहे. गुरुवारी भरदिवसा शहरातील गजबजलेल्या भागात एकाच दिवशी तब्बल तीन - ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने न हिसकावून चोरट्यांनी धूम ठोकल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
हैदराबाद बँकेसमोर, साईबाबा - मंदिर परिसर आणि शेकापूर रस्ता या ठिकाणी मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी महिलांना लक्ष्य करत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या झटपट हिसकावून नेल्या. काही क्षणातच घटना घडवून चोरटे पसार झाल्याने परिसरात एकच ड खळबळ उडाली.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी खानापूर येथे शेतात काम न करणाऱ्या वृद्ध महिलेला मारहाण करून तिचे दागिने लुटल्याची घटना 7 ताजी असतानाच शहरात सलग तीन ठिकाणी लूट झाल्याने महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी पोलिसांनी तात्काळ कारवाई करून या टोळीला जेरबंद करावे, अशी जोरदार मागणी केली आहे.
सोनाच्या वाढत्या दरामुळे (प्रति तोळा सुमारे १.४० लाख) अशा प्रकारच्या गुन्ह्यांना खतपाणी मिळत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित चोरटे दिसून आले असून ते बिना नंबर प्लेटच्या होंडा शाईन मोटारसायकलवर असल्याचे समोर आले आहे. पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी सांगितले की, चोरट्यांचा माग काढण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले असून सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे.
आरोपींना अटक करण्यात येईल. आष्टी पोलिस दलासाठी ही घटना आव्हान ठरत असून वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, महिलांनी सतर्क राहावे, एकट्याने निर्जन ठिकाणी फिरणे टाळावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.