बीड

Beed Bribe News | महावितरणचे कार्यकारी अभियंता पाच हजाराची लाच घेताना रंगेहात एसीबीच्या ताब्यात!

पाण्याच्या प्लांटसाठी ट्रान्सफॉर्म बसवण्यासाठी मागितली लाच

पुढारी वृत्तसेवा

अंबाजोगाई :- महावितरणच्या अंबाजोगाई विभागाचे कार्यकारी अभियंता मनिष डाकरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने मंगळवारी पाच हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार यांचा पाण्याचा एक प्लांट असून त्यासाठी ट्रान्सफॉर्मर बसविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. तयार करण्यात आलेल्या या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी स्वाक्षरी करून मंजुरी देण्यासाठी कार्यकारी अभियंता मनीष डाकरे यांनी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 'एसीबी' कडे रितसर तक्रार केली. या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी व पडताळणी करताना महावितरण चे कार्यकारी अभियंता डाकरे यांना पाच हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले. 'एसीबी' ने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला. सापळ्यादरम्यान डाकरे यांनी लाचेची रक्कम स्वीकारताच 'एसीबी' च्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईमुळे 'महावितरण' विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून, संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. आणि त्यानुसार संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमने केली आहे. या सर्व घटनेमुळे अंबाजोगाई शहरास कुठेतरी गालबोट बसत असल्याचे चित्र निर्माण होत असल्याचे सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT