Extra marital affairs news (AI Generated Image) Pudhari
बीड

Beed News: चार मुलांची आई दोन मुलांचा बाप असलेल्या तरुणा सोबत पळून गेली; बीडच्या लव्हस्टोरीची गावभर चर्चा

Kej Taluka News: केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्यात दोन्ही कुटुंबाकडून तक्रारी दाखल, एक मुलाला महिलेने नेले सोबत

पुढारी वृत्तसेवा

Beed Extra Marital Affair Case

केज :- प्रेम आंधळ असतं असे म्हणतात तसाच प्रकार युसुफ वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असून चार मुलांची आई आलेली विवाहिता ही तिच्या तीन मुलांना घरी सोडून एका लहान मुलाला सोबत घेऊन तिच्या घरा शेजारी राहत असलेल्या दोन मुलांच्या बापा सोबत पळून गेली आहे.

केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातील २६ वर्ष वयाची आणि ४ मुलांची आई असलेली विवाहित तरुणी ही तिच्या तीन मुलांना घरी सोडून एका मुलाला सोबत घेऊन शेजारी राहत असलेल्या भावकीतील एका २७ वर्षीय प्रियकरा सोबत पळून गेली आहे. ती ज्याच्या सोबत पळून गेली तो तिचा प्रियकर सुद्धा विवाहित असून तो सुद्धा दोन मुलांचा बाप आहे. मात्र या प्रेमी युगलांनी आपापल्या मुला बाळांचा आणि कुटुंबाचा विचार न करता पळून गेले आहेत.

या प्रकरणी दोघांच्याही कुटुंबातील नातेवाईकांनी ते दोघे बेपत्ता असल्याच्या स्वतंत्र तक्रारी युसुफवडगाव पोलिस ठाण्यात दाखल केल्या आहेत. मात्र या चार मुलांची आई ही दोन मुलांचा बाप असलेल्या प्रियकरा सोबत पळून गेल्याची चर्चा परिसरात चांगली रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT