Beed crime 
बीड

Beed crime: हृदयद्रावक ! मालमत्तेच्या वादातून मुलाकडून जन्मदात्री आईची निर्घृण हत्या; परळी तालुक्यातील घटना

mother murdered by son घर नावावर करून देत नाही म्हणून पोटच्या मुलाकडून कृत्य, घटनेने संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे

पुढारी वृत्तसेवा

mother murdered by son Beed crime update

परळी वैजनाथ: परळी तालुक्यातील भोजनकवाडी गावात एक हृदयद्रावक अन् धक्कादायक घटना घडली आहे. जन्म दिलेल्या आईला केवळ घर नावावर करून देत नाही म्हणून तिच्या मुलानेच डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केली. ही घटना शनिवारी (दि.20) सकाळी 9.30 वाजता घडल्याचे उघडकीस आली आहे.

या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, आरोपी चंद्रकांत कांगणे (वय-अंदाजे 26 वर्ष) हा आपल्या आईकडे (मयत सुनंदा ज्ञानोबा कांगणे, वय अंदाजे 50 वर्ष, रा. भोजनकवाडी ) सतत घर नावावर करून देण्याची मागणी करत होता. मात्र, मयत हिने घर तिच्या नावेच ठेवले. त्यामुळे आरोपी चंद्रकांत याने रागाच्या भरात शनिवारी (दि. 20) सकाळी 9.30 वाजता आईच्या डोक्यात कुरुंदाचा दगड घालून गंभीर जखमी केले.

सुनंदा यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध [गु.र.नं. 405/2025, कलम 103(1)] BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुलाला पोलीसांनी अटक केली आहे असून, अधिक तपास पो.नि. सय्यद हे करीत आहे. या हृदयद्रावक अन् धक्कादायक घटनेने संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT