Woman Abuse pudhari
बीड

Beed Crime | कोयत्याचा धाक दाखवून तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नराधमाविरुद्ध पॉक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

केज :- कोयत्याचा धाक दाखवून तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर दोन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यात घडली असून नराधमा विरुद्ध पॉक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, एका ऊसतोड मजूर असलेल्या कुटुंबातील १३ वर्ष ८ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला सूरज अशोक खरात (रा.जामरुन, चारठाणा ता. जिंतूर जि. परभणी) याने कोयत्याने जीवे मारण्याचा धाक दाखवून दि. १४ जानेवारी रोजी दुपारी १२:०० वाजण्याचे सुमारास सुर्डी (सोने सांगवी) शिवारातील रोडगे यांचे शेतात तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्या नंतर दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:०० वाजण्याच्या सुमारास त्या अल्पवयीन मुलीवर त्याने पुन्हा केज पोलिस ठाणे हद्दीतील हदगाव डोका ता. केज शिवारातील बनसोडे यांचे शेतात बळजबरीने कोयत्याचा धाक दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केला.

या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारी वरून दि. १० फेब्रुवारी रोजी रात्री सूरज अशोक खरात याच्या विरुद्ध युसुफवडगाव ता. केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ३४/२०२६ भा. न्या. सं. ६४, ६४(२) (एम), ३५१ यासह पॉक्सो चे कलम ४, ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी फरार असून पोलिस त्याचा तपास करीत आहेत. या प्रकरणी पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT