केज:- केज तालुक्यातील एका गावात एका ५० वर्षाच्या आजोबाने स्वतःच्या अवघ्या ३ वर्ष वयाच्या नातीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून त्या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक विवाहित तरुणी ही तिच्या माहेरी आलेली असताना त्या विवाहित तरुणीच्या वडिलांनी स्वतःच्याच मुलीच्या तीन वर्ष वयाच्या चिमुकलीवर अत्याचार केला आहे. ही घटना दि. १६ ते दि. २५ एप्रिल दरम्यान घडली.
चिमुकलीने तिला त्रास होऊ लागल्याने हा प्रकार आईला सांगितला. त्या नंतर त्या विवाहित मुलीने तिच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या तक्रारी वरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात पोक्सोचे कलम ४,६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांनी दि. १ मे रोजी रात्री नराधम आजोबाला ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.