Crime Pudhari Photo
बीड

Beed Crime: कामाचे पैसे मागितल्यावर मजुरावर जीवघेणा हल्ला; पती-पत्नीविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

मुलाने केलेल्या कामाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका मजुरास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली

पुढारी वृत्तसेवा

केज: केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे मुलाने केलेल्या कामाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एका मजुरास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी संबंधित पती-पत्नीविरुद्ध केज पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनराज बाबुराव वाघमारे (वय ५४, रा. जिवाचीवाडी, ता. केज) हे २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता गावातील किराणा दुकानासमोर आपल्या मुलाने केलेल्या कामाचे पैसे मागण्यासाठी माऊली दिनकर चौरे यांच्याकडे गेले होते. यावेळी “तुझे कसले पैसे? माझ्याकडे पैसे नाहीत,” असे म्हणत माऊली चौरे व त्यांची पत्नी शीतल चौरे यांनी धनराज वाघमारे यांना जातीवाचक शिवीगाळ केली.

त्यानंतर दोघांनी मिळून वाघमारे यांना लाथाबुक्क्यांनी व चापटांनी मारहाण केली. तसेच दगड व वीट डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात वाघमारे यांचे डोके फुटले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

या प्रकरणी धनराज वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माऊली चौरे व शीतल चौरे यांच्याविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास प्रभारी सहाय्यक पोलिस अधीक्षक ऋषिकेश शिंदे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT