Crime News pudhari photo
बीड

Beed Crime : केज शहरातून तीन दिवसात दोन महिला आणि एका पुरुषाचे अपहरण, पोलिसांत तक्रारी दाखल

पुढारी वृत्तसेवा

केज :- केज शहरातून मागील तीन दिवसात दोन महिला आणि एका पुरुषाचे अज्ञात कारणासाठी अज्ञात व्यतीने अपहरण करण्याच्या वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत.

या बाबतची माहिती अशी की, दि. ३ सप्टेंबर रोजी केज शहरातून एका भागातील विवाहित महिलेचा पती हा कामा निमित्त पुणे येथे गेला होता त्‍याची ३५ वर्षीय पत्‍नीला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेले आहे. अपहरण करण्यात आलेल्या महिलेची उंची ४ फुट ५ इंच, रंग सावळा, अंगात फिकट गुलाबी रंगाची साडी, पायात काळ्या रंगाची चप्पल असे आहे. तिच्या नवऱ्याच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या घटनेत दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास केज शहरातील एक १९ वर्षाची विवाहित तरुणी केज-बीड रोडवरील गुरुमुख हॉटेलच्या समोर दुध डेअरी वरुन दूध आणण्यासाठी गेली होती. त्या १९ वर्षीय तरुणीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फुस लावुन पळवुन नेले आहे. तिच्या आईच्या तक्रारी वरून केज पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर तिसऱ्या घटनेत कळंब रोड, केज येथे पाण्याच्या प्लॅन्टवर काम करीत असलेला ३२ वर्षीय विवाहित तरुण अजिम महेबुब सय्यद (रा. कळंब रोड, केज) हा १२ सप्टेंबर रोजी कामावर गेला. नंतर घरी आलाच नाही. त्याचा रंग-गोरा, अंगात आकाशी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, पायात चप्पल असे वर्णन असलेल्या अजीम सय्यद यास अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फुस लावुन पळवुन नेल्याची तक्रार त्याच्या बायकोने दिली आहे. या तिन्ही वेगवेगळ्या अपहरणाच्या घटनेचा तपास पोलिस कॉन्स्टेबल त्रिंबक सोपने आणि बजरंग मुंडे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT