minor girl abuse case  file photo
बीड

Beed Crime | धक्कादायक! केज तालुक्यात साडेतीन वर्षाच्या मुलीवर ६५ वर्षाच्या वृद्धाने केला लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

केज तालुक्यातील काळेगाव (घाट) येथे माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली

पुढारी वृत्तसेवा
गौतम बचुटे

केज : केज तालुक्यातील काळेगाव (घाट) येथे माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका ६५ वर्षीय वृद्धाने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीला घरात कोंडून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १२ मे) सायंकाळी ५:०० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडित बालिकेची आई कामावर गेलेली होती, तर वडील घरी आजारी होते. यावेळी साडेतीन वर्षांची बालिका आणि तिचा पाच वर्षांचा भाऊ घराबाहेर खेळत होते.

या संधीचा फायदा घेत शेजारी राहणाऱ्या ६५ वर्षीय आरोपीने चिमुकलीच्या भावाला खाऊ आणण्याच्या बहाण्याने दुकानावर पाठवले. त्यानंतर त्याने बालिकेला घरात बोलावून दरवाजाची कडी आतून लावून घेतली आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

मुलगा दुकानातून परतल्यानंतर त्याला आपली बहीण दिसली नाही. त्याने ही माहिती तातडीने आपल्या वडिलांना दिली. वडिलांनी मुलीचा शोध घेतला असता शेजारच्या वृद्धाचे घर आतून बंद असल्याचे दिसले. संशय आल्याने त्यांनी आवाज देऊन दरवाजा उघडायला लावला. दरवाजा उघडताच पीडित मुलगी आणि तो वृद्ध घरात मिळून आले.

प्रथमदर्शनी मुलीचे अंतर्वस्त्र फाडलेल्या अवस्थेत दिसल्याने आरोपीने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले. नातेवाईकांनी तातडीने केज पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पीडित मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात संबंधित नराधमाविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पॉक्सो) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT