Satara News Pudhari Photo
बीड

Beed Crime | अनेक डॉक्टरांना ३ कोटींवर गंडा आंतराराज्यीय ठकसेन पोलिसांच्या जाळ्यात

उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालय केज यांनी आरोपीस शिताफीने केली अटक : विविध राज्यांमध्ये 15 पेक्षा अधिक गुन्हे दाखल, कराड येथून घेतले ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

केज :- वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांना उच्च व पदवित्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रासह गुजरात, चंदिगढ, पंजाबसह इतर राज्यात पंधरा पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेला ठक उपविभागीय पोलिस अधिकारी व्यंकटराम यांच्या पथकाने कराड येथून ताब्यात घेतला आहे. त्याने आतापर्यंत सुमारे ३ कोटी ८६ लाख ६१ हजार रु. घेऊन अनेक डॉक्टरांना फसविले आहे.

या बाबतची माहिती अशी की, वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश रामचंद्र तोंडे हे बारामती येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांना एम डी या पदवित्तर उच्च वैद्यकीय शिक्षणासाठी एस. के. इज्युकेशन संस्था वरील फेसबुक अकाऊंटवरुन सौरभ सुहास कुलकर्णी रा. नागपुर याचे सोबत ओळख झाली.

डॉ तोंडे यांना एमडी मेडीसीनसाठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश घ्यायचा असल्याने ते सौरभ कुलकर्णी याचे संपर्कात होते. सौरभ कुलकर्णी याने मॅनेजमेंट कोट्यातून एमडी साठी इमर्जन्सी या शाखेसाठी प्रवेश हवा असे म्हण्यावरून कुलकर्णी तीन वर्षाची फिज ही ९९ लाख रु. असल्याचे सांगितले. ती फी कमी करू ६५ लाख रु मध्ये जवाहलाल नेहरू मेडिकल कॉलेज येथे ॲडमिशन करून देण्याचे त्याने सांगितले. या साठी त्याने डॉ तोंडे यांच्याकडून ८ लाख रु घेतले. परंतु त्यांचे कोणत्याही यादीत नाव नसल्याने डॉ तोंडे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आहे. त्यावरून त्यांनी धारूर पोलिस ठाण्यात सौरभ कुलकर्णी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकट राम यांनी तपास केला असता सदर आरोपी विरुद्ध महाराष्ट्र आणि राज्य बाहेर अनेक गुन्हे असल्याचे निदर्शनास आले. त्यावरुन गुन्हयाचा तपास जलद गतीने करुन आरोपीची गोपनीय, टेक्निकल ॲनालिसिस सेल बीड व इतर माध्यमाद्वारे माहीती काढून आरोपीचा ठावठिकाणा माहीती करुन घेवून आरोपीस अटक करणे कामी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय केज येथील एक तपास पथक रवाना केले. आरोपी यास शिताफीने कराड जि. सातारा येथे आज दि.१३ जानेवारी रोजी ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपी वरील दाखल असलेले गुन्हे :-

१) सरकार वाडा नाशीक शहर गुरनं. ०९/२०१६

२) टेंभुणी सोलापुर ग्रामीण गुरनं. ६१७/२०१७

३) चंदनजिरा - जालना गुरनं. ४५९/२०२३ ४) घनसांगवी -जालना गुरनं. ५१४/२०२५ ५) धनतोली- नागपुर गुरनं. २०३/२०२५

६) खडकी- पुणे गुरनं. २८७/२०२५

७) दहीसर - मुंबई गुरनं.676/2024

८) विजापुर नाका- सोलापुर शहर

९) धनतोली -नागपुर शहर गुरनं. १७१/२०२२

१०) अमृतसर- राज्य-पंजाब गुरनं. ५३/२०२४

१२) जरी फटका-नागपुर शहर गुरनं. ७७१/२०२४

१२) तासगाव- सांगली गरनं. ४७६/२०२५

१३) हुडकेश्वर- नागपुर शहर गुरनं. ४९५/२०२४

१४) डेसा सीटी, बनास फाटा गुजरात गुरनं. २४५/२०२४

१५) धारुर जि.बीड गुरनं.४५३/२०२५ येथे देखील वरील प्रमाणे विविध प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे केले

सौरभ कुलकर्णी याने आता पर्यंत अनेकाना फसवून ३ कोटी ८६ लाख ६१ हजार रु. लाटले असल्याचे प्रथम दर्शनी आढळून आले आहे. यापेक्षा जास्त लोकांना त्याने फसविले असल्याचा अंदाज आहे. सदर कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक वेंकटराम, पोलिस उपनिरीक्षक जावेद कराडकर, पोलिस उपनिरीक्षक अमिर ईनामदार, पोलिस नाईक अनिल मंदे आणि आरोपीला ताब्यात घेण्यासाठी त्यांना कराड येथील नागरिक महेश कुर्ले आणि अशोक कांबळे याच बरोबर महामार्ग पोलिस कर्मचारी मोहिते यांनी मदत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT