Moneylending Raid Pudhari
बीड

Beed Crime : केज तालुक्यातील सावकारकी करणाऱ्या सावकारावर पोलिस, सहाय्यक निबंधकांची संयुक्त धाड!

धाडीत व्याजापोटी कर्जदारा कडून घेतलेले ५५ धनादेश आणि ४ खरेदीखत व इतर कागदपत्रे घेतली ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

केज:- केज तालुक्यातही जीवाचीवाडी येथील एका सावकारा विरुद्ध पोलिस आणि सहाय्यक उपनिबंधक कार्यालयाने धाड टाकून केलेल्या कारवाईत वेगवेगळ्या कर्जदाराकडून त्या सावकाराने व्याजापोटी घेतलेले ५५ धनादेश, ४ खरेदी खत आणि इतर कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. यामुळे तालुक्यातील अवैधरित्या सावकारकी करून कर्जदाराला वेठीस धरणाऱ्या खाजगी सावकारांचे धाबे दणाणले आहे.

केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथील राजाभाऊ सुखदेव केदार हे सावकारकी करीत असून ते कर्जदाराकडून व्याजापोटी अवाच्या सव्वा दराने व्याज घेऊन पिळवणूकी करून सावकारकी करून जमिनी लिहून घेत असल्याची तक्रार एकाने दिली होती. त्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दि. १९ नोव्हेंबर रोजी नानासाहेब चव्हाण विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, लातुर व सतिश तोटावार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या पथकाने राजाभाऊ सुखदेव केदार (रा. जिवाचीवाडी ता. केज जि. बीड) यांच्या राहत्या घरी सहकार विभाग व केज पोलिस यांनी संयुक्त कारवाई केली.

त्याच्या घरी पथकाने धाड टाकून घेतली असता त्यात कथित अवैध सावकारी व्यवहारा बाबत संशयित असलेले व्याज उल्लेख हिशेब व एकूण ५५ कोरे धनादेश आणि ४ खरेदी खत आढळून आले. ते सर्व धनादेश, खरेदीखत आणि इतर कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. या प्रकरणी सावकारी कायद्याअंतर्गत पुढील चौकशी करण्यात येत आहे.

नागरिकांना आवाहन

अवैध सावकारी व्यवहार करणाऱ्यावर प्रभावी नियंत्रण व कार्यवाही करण्याकरीता सहकार विभागाचे जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बीड व प्रत्येक तालुक्यातील सावकारांचे सहायक निबंधक तथा सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाकडे गोपनिय स्वरुपात तक्रार दाखल करुन अशा व्यक्तींची माहिती द्यावी. तक्रारदाराचे नाव धाडीच्या कार्यवाहीपर्यंत गोपनिय ठेवून आवश्यक कायदेशीर कार्यवाही तात्काळ करण्यात येईल. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT