Kej police station FIR after 9 months
केज : न्यायालयात आमच्या विरोधात साक्ष का दिली, या कारणावरून एकाच कुटुंबातील सात सदस्यांना अकरा जणांनी मारहाण केली. या मारहाणीसाठी कोयता, काठी आणि कुऱ्हाडीचा वापर केला होता. पोलिसांनी या प्रकरणी सखोल तपास करून नऊ महिन्यांनंतर अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हे प्रकरण १८ मार्च २०२५ रोजी घडले होते. त्या दिवशी रामभाऊ काकडे आणि त्यांचा कुटुंबीय शेतात काम करत असताना राजाभाऊ मारुती काकडे याने भाग्यश्री रामभाऊ काकडे हिला काठीने पायावर मारहाण केली. यानंतर बालासाहेब मारूती काकडे याने दयानंद रामभाऊ काकडे याच्या डोक्यात कोयत्याने मारले, तर गोकुळ बालासाहेब काकडे याने कुऱ्हाडीच्या दांड्याने त्याच्या पायावर मारहाण केली. हरीओम राजाभाऊ काकडे याने रामभाऊ काकडे यांना शिवीगाळ करत पायावर, हातावर, पाठीवर लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर ओमप्रकाश काकडे याला काठीने मारहाण केली.
लक्ष्मी बालासाहेब काकडे आणि अनुराधा बाबासाहेब काकडे यांनी जयश्री काकडे हिला लाथाबुक्यांनी मारहाण केली, तर सविता काकडे हिला रुकमिन हनुमंत साखरे आणि पुजा राजाभाऊ काकडे यांनी केस धरून लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि शिवीगाळ केली. यानंतर सर्व आरोपींनी मिळून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.
या संदर्भात जयश्री काकडे यांनी पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पोलिसांनी उपलब्ध पुरावे आणि चौकशी केल्यानंतर २५ डिसेंबर २०२५ रोजी केज पोलिस ठाण्यात अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींच्या नावात राजाभाऊ मारूती काकडे, बालासाहेब मारूती काकडे, बाबासाहेब मारूती काकडे, गोकुळ बालासाहेब काकडे, हरीओम राजाभाऊ काकडे, लक्ष्मी बालासाहेब काकडे, अनुराधा बाबासाहेब काकडे, विद्या राजाभाऊ काकडे, सुदामती मारूती काकडे, रुकमिन हनुमंत साखरे आणि पुजा राजाभाऊ काकडे यांचा समावेश आहे.
पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम तपास करीत आहेत.