केज : केज येथील टोल नाक्यावर चार मद्यधुंद तरुण दारूच्या नशेत गोंधळ घालत असताना खुद अप्पर पोलिस अधीक्षक यांनी हा प्रकार पहिला आणि त्यांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती देत कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी तात्काळ चार तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची माहिती अशी, केज-मांजरसुंबा महामार्गावरील उमरी टोल नाक्यावर बुधवारी (दि.१) सायंकाळी सातच्या सुमारास कारमध्ये मद्यधुंद अवस्थेत चार तरूण गोंधळ घालित होते.दरम्यान त्याचवेळी अंबाजोगाई विभागाच्या अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके या अंबाजोगाईकडे जात असताना त्यांनी हा प्रकार पहिला. त्यांनी तात्काळ ही माहिती केज पोलिस पोलिसांना कळवून कारवाईचे आदेश दिले.
माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्यासह पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, वाहन चालक पोलीस कॉन्स्टेबल शिंदे आणि गृहरक्षक दलाचे जवान सद्दाम इनामदार हे सरकारी वाहनाने टोल नाक्यावर हजर झाले. व त्यांनी या तरूणांना ताब्यात घेतले. पोलिसांनी ब्रेथ ॲनालायझर यंत्राद्वारे त्यांची तपासणी केली असता त्या चौघांनी अल्कोहोल प्राशन केले असल्याचे निष्पन्न झाले. त्यानतंर पोलिसांनी पंकज पपु गिरी वय (३३ वर्षे), (रा. मोरेवाडी पाण्याची टाकी अंबाजोगाई), शिवराज सदाशिव थोरात वय (३४ वर्षे) (रा. रूई धारुर ता. धारुर), धोंडीराम बाबुराव लोखंडे वय (३० वर्षे) (रा. संतकबीर नगर अंबाजोगाई) निखील महादेव पाडुळे वय (३० वर्षे) रा. रमाइ चौक अंबाजोगाई) यांना ताब्यात घेऊन त्याच्यावर केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.