Crime News  Pudhari
बीड

Beed Crime News | धारूर येथील एकावर प्राणघातक हल्ला; कोयत्याने सपासप वार

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

पुढारी वृत्तसेवा

अतूल शिनगारे

धारूर : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मंगळवारी (ता. १९) सायंकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, “माझ्या पत्नीशी संबंध ठेवतोस का?” या संशयावरून दोघांमध्ये तीव्र शाब्दिक वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर संतापाच्या भरात आरोपीने जवळील कोयता काढून तरुणावर सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेनंतर नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमी दिनेश कोमटवार या तरुणाला आरोपीच्या तावडीतून सोडवले व उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी आरोपी अभिजीत गायकवाड अभिजीत गायकवाड याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गर्दीच्या ठिकाणी झालेल्या या हल्ल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT