आष्टी : तालुक्यातील अंभोरा पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धामणगाव येथील शेतातील जुगार अड्ड्यावर सापळा रचून सोमवारी धाड टाकली. यावेळी १२ जुगारी लोकांना रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी, जुगार साहित्य असा आठ लाख ऐंशी हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जार करत आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी बाळकृष्ण हनपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मंगेश साळवे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे, पोलीस हवालदार मुकूद एकशिंगे, पोलीस अंमलदार शिवदास केदार, सतीश पैठणे, यांनी केली. पुढील तपास सहायक फौजदार सोपान येवले करीत आहे. अंभोरा पोलिसांनी धामणगांव येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून कारवाई केली. त्या कारवाईचे नागरिकातुन कौतुक होत असले तरी दादेगांव, दौलावडगाव, धानोरा, देवळाली, उंदरखेल यासह अन्य गावातील जुगार अड्ड्याचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हॉटेल ढाब्याचरील देखील गोपनीय माहिती घेऊन कारवाई आवश्यक आहे.
बीटात किती खोटं!
एकीकडे सगळे काही बंद असल्याचा आव आणला जातो. तर दुसरीकडे हद्दीत असे जुगारी पकडले जात असतील तर बीटात किती खोट आहे. हे सांगायची गरज नाही. असे बोलले जात आहे.
बीट अंमलदारांना होते दरमहा लक्ष्मी दर्शन
ठाणे हद्दीतील एक दोन बीट अंमलदार सोडता इतर बीट अंमलदार ठाणेदारांना अंधारात ठेऊन पायाला भिंगरी बांधून फिरतात. बीट मधून दरमहा अंमलदार लक्ष्मी दर्शन घेऊन डोळ्याला पट्टी बांधून निघून जातात. पण यातून नक्कीच आरगड गळ्यात आल्यानंतर ठाणेदाराला देखील अडचण निर्माण होणार आहे.